Falguni Pathak On Neha Kakkar : बॉलिवूड गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. दोघांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. फाल्गुनीच्या 'मैने पायल है छनकाई' या गाण्याचे 'ओ सजना' हे रिमेक गाणं नेहा कक्करने गायलं आहे. त्यामुळे सध्या नेहा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत फाल्गुनी म्हणाली,"गाण्यांचा रिमेक कोणीही करू शकतं ही चांगली गोष्ट आहे. अशा रिमेक झालेल्या गाण्यांचा चांगल्या पद्धतीने स्वीकार करा. पण त्या गाण्याचा दर्जा तोच ठेवावा". फाल्गुनीच्या या व्यक्त्यामुळे तिची नाराजी दिसून येत आहे. मात्र नेहाने बनवलेला रिमेक माझ्या पसंतीस उतलेला नाही, असंही फाल्गुनी म्हणाली आहे.
फाल्गुनी पुढे म्हणाली,'मैने पायल है छनकाई' हे माझं गाणं 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आजही हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे". याआधी एका मुलाखतीत फाल्गुनी म्हणाली होती,"शक्य असते तर मी कायदेशीर कारवाई केली असती. याबद्दल आधी माहिती असलं असतं तर मी कायदेशीर कारवाई केली असती. मला याबद्दल माहिती नव्हती याबद्दल माफ करा. मला माहीत असते तर मी काहीतरी केले असते. एखादी गोष्ट जेव्हा स्वतःवर बेतते तेव्हाच ती चांगली कळते'.
नेहा कक्करच्या 'ओ सजना' या गाण्यात धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा या कलाकारांनी काम केलं आहे. 19 सप्टेंबर रोजी नेहा कक्करचं हे गाणं रिलीज झालं. गायिका नेहा कक्कर रिमिक्स गाण्यासाठी ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अशीच अनेक जुनी गाणी रिमिक्स केली असून, त्यामुळे तिच्यावर बरीच टीका झाली आहे.
संबंधित बातम्या