प्रकृती अस्वास्थ्यामुळे संगीतकार अनू मलिक रुग्णालयात
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2016 03:16 PM (IST)
नवी दिल्ली : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांना अस्वस्थ वाटत असल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. अनू मलिक यांची पत्नी अंजू मलिक यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन एका फोटोद्वारे याबाबत माहिती दिली. यांमध्ये 55 वर्षीय अनू मलिक हॉस्पिटलमधील बेडवर असून, त्यांच्या बाजूला त्यांची आई आणि बहीण उभी असल्याची दिसत आहे. अनू मलिक यांनी बॉलिवूडमधील 350 हून अधिक सिनेमांना संगीत दिलं आहे. ‘दम लगाके हईशा’ या सिनेमाला नुकतंच त्यांनी संगीतल दिलं असून, हा सिनेमा यशराज फिल्म्सने प्रोड्युस केला आहे.