मुंबई: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदीबाबत देशभरात चर्चा सुरु असताना आता या वादात माजी क्रिकेटर संजय मांजरेकरनही उडी घेतली आहे. मनसेकडून 'ए दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनला होणाऱ्या विरोध पाहून मांजरेकरनं त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

'ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा शूट केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा, यापुढे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा करणार नाही”, असं करण जोहरने म्हटलं आहे. पण तरीही मनसेचा विरोध मावळलेला नाही.

पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित करण्यास मनसे विरोध केला. ‘मल्टिप्लेक्सच्या काचा खूप महागड्या असतात हे विसरु नका’ असा धमकीवजा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

मनसेच्या या भूमिकेनंतर संजय मांजरेकरनं ट्वीटरवरुन मनसेवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

'केवळ एक आमदार असलेला पक्ष मनसेनं काहीही धडा घेतलेला नाही. गुंडगिरी आणि धमक्या देऊन त्यांनी ठरवलं आहे की, आगामी निवडणुकीत ते शून्य आमदार असलेला पक्ष बनणार' असं त्यानं ट्वीट केलं आहे.


दरम्यान, मांजरेकरच्या या ट्वीटनंतर मनसे काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
यापुढे पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर

दुसरीकडे ए दिल है मुश्किल सिनेमा प्रदर्शित व्हावा यासाठी अटोकाट प्रयत्न करीत आहे. या संपूर्ण वादावर काल त्यानं मौन सोडलं आणि आपली भूमिका स्पष्ट केली.

“गेल्या काही दिवसांपासून मी शांत का आहे असं विचारलं जात होतं. मात्र मला हेच सांगायचं होतं. देशापेक्षा मोठं काहीही नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान ऐ दिल है मुश्किल सिनेमाचं शूटिंग झालं. मात्र त्यावेळी भारत-पाकिस्तानदरम्यान शांततेसाठी सरकारचे प्रयत्न सुरु होते. शांततेसाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केले. मला माझ्या देशभावनेचा आदर होता आणि कायम राहील”, असं करण जोहरने म्हटलं आहे.

मी दहशतवाद्यांचा निषेध करतो. मला जवानांचा आदर आहे. माझ्यासाठी माझा देश पहिल्यांदा आहे.  मात्र सिनेमावर बंदी घालणं, हा माझ्या सर्व क्रू मेंबरवर अन्याय आहे, असंही करण जोहरने म्हटलं आहे.

मला राष्ट्रद्रोही म्हटलं गेलं. त्याचं खूप दु:ख झालं, असंही करणने नमूद केलं. माझ्यासाठी माझा देश सर्वस्वी आहे. यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला माझ्या सिनेमात स्थान नसेल, असं करण जोहरने म्हटलं आहे.

मनसेचा इशारा

‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. तर शाहरुख खानच्या रईस या सिनेमाता पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडला. मात्र, करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला.

सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशनने करण जोहरचा सिनेमा थिएटरमध्ये न प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

VIDEO:


संबंधित बातम्या :


यापुढे पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर

मनसेच्या इशाऱ्यानंतर करण जोहरचं पोलिस आयुक्तांना साकडं

पाकिस्तानी कलाकारांबाबत मुकेश अंबानी म्हणतात…

पाक कलाकारांबाबत आमीरची पत्नी म्हणते…

‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप

भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका

माहिरा खानची ‘रईस’मध्ये रिप्लेसमेंट नाही, निर्मात्याचे संकेत

‘ऐ दिल..’मध्ये फवादच्या चेहऱ्यावर ‘या’ हिरोचा मुखवटा

पाक कलाकार असलेले चित्रपट दाखवणार नाही, सिंगल स्क्रीन थिएटर मालकांचा निर्णय