बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक असलेली राधिका आपटे तिच्या सिनेमांमधील अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. सोबतच तिच्या नवनवीन लुकचीही चाहत्यांमध्ये चर्चा राहिली आहे. यामुळेच मराठमोळ्या राधिकाचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. जरी राधिकाच्या वॉर्डरोबमध्ये सर्व प्रकारचे आउटफिट असले तरी ती प्रत्यक्षात बीच बेबी आहे, म्हणूनच तिच्याकडे बिकीनीतील पर्याय जास्त आहेत. तिच्या प्रत्येक फोटोत तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही तिच्या सौंदर्याकडे डोळेझाक करू शकणार नाही.






राधिकाने ऑल ब्लू लूक कसा स्टाईल केलाय ते या फोटोत पहायला मिळतंय. तिने ब्लू डेनिम शॉट्ससह तिची ब्लू पोल्का डॉट बिकिनी पेअर केली आहे. परफेक्ट लूकसाठी राधिकाने हे आउटफिट टोपीसोबत कॅरी केले आहे. तिची स्माईल सांगत आहे की ती मस्तीच्या मूडमध्ये आहे.






राधिका आपटेचा आणखी एक बिकीनी लूक ज्यामध्ये तिने पुन्हा एकदा पोल्का डॉट बिकिनी निवडलीय. सी ग्रीन कलरच्या या बिकिनीसह अभिनेत्रीने सनग्लासेस घातले होते. जे या सिझनसाठी योग्य आहे.






आपल्या बीच वेअर कलेक्शनमध्येही राधिकासारखी मोनोकिनी असणे आवश्यक आहे. तलावाच्या किनारी या ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट मोनोकिनीमध्ये राधिका जबरदस्त आकर्षक दिसत आहे. राधिकाने हा लूक परफेक्ट केस आणि सनग्लासेससह कॅरी केला होता.