Esha Deol Bharat Takhtani Divorce : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini) ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. आजवर दोघांनीही अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यांची लेक ईशा देओलदेखील (Esha Deol) बॉलिवूडचा भाग आहे. पण आपल्या आई-वडिलांप्रमाणे तिला यश मिळालेलं नाही. 


ईशा देओल व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या नात्यात दुरावा आल्याचं समोर आलं आहे.


ईशा देओल अन् भरत तथ्तानीमध्ये सारं काही आलबेल? 


बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, ईशा आणि भरत कोणत्याही पार्टी किंवा इव्हेंटमध्ये एकत्र दिसून आलेले नाहीत. तसेच एकमेकांसोबतचे फोटोही त्यांनी शेअर केलेले नाहीत. ईशाचा पती भरत याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं आहे. याच कारणाने त्यांच्यात सारं नाही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. भरतची गर्लफ्रेंड बंगळूरमध्ये राहणारी आहे. अद्याप देओल कुटुंबियांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. 


नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


ईशा आणि भरत यांचा घटस्फोट होणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी भरतला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. भरतचं त्याच्या कुटुंबियांवर आणि पत्नीवर खूप प्रेम आहे असं वाटायचं पण हे सर्व नाटक आहे, ईशासोबत असं व्हायला नको होतं.






ईशा आणि भरत 2012 मध्ये अडकले लग्नबंधनात


ईशा आणि भरत 29 जून 2012 रोजी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर पाच वर्षांनी ईशाने राध्याला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये ईशाला मिराया ही दुसरी मुलगी झाली. ईशा आणि भरत अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. 


ईशा देओलबद्दल जाणून घ्या.. (Who is Esha Deol)


ईशा देओल ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची ती लाडकी लेक आहे. 'कोई मेरे दिल सौ पूछे' या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. त्यानंतर 2004 मध्ये आलेला 'घूम' हा सिनेमा चांगलाच गाजला.


संबंधित बातम्या


Hema Malini Birthday Party : हेमा मालिनीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा, पाहा फोटो!