Esha Deol and Bharat Takhtani : बॉलिवूडमधील दिग्गज जोडपं असलेलं धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची मुलगी ईशा देओलने (Esha Deol) घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. मागील काही काळापासून दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्या बातमीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर ईशाने काडीमोड घेतला आहे.


ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी यांनी संयुक्तपणे एक निवेदन जारी करत याची माहिती दिली आहे. या निवेदनात दोघांनी म्हटले आहे की, 'आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या जीवनातील हा बदल आपल्या आणि आपल्या मुलांच्या दोघांच्या हिताचा आहे आणि तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल याची आम्हाला अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले. 


वैवाहिक आयुष्यात वादळ सुरू असल्याची होती चर्चा


ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळं सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. गेल्या वर्षी जूनमध्ये तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ईशाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते आणि तिच्या पतीवरील अपार प्रेमही व्यक्त केले होते. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला भरत उपस्थित नव्हता किंवा ईशाच्या वाढदिवसालाही तो उपस्थित नव्हता तेव्हापासून त्यांच्या नात्यातील मतभेदाच्या अफवा सुरू झाल्या होत्या. या निमित्ताने दोघांमध्ये सर्व काही सुरळीत होत नसल्याची चर्चा रंगू लागली होती. 






कधी कधी काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतात...


मागील काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. घटस्फोटाबाबत दोघांमध्ये बरीच चर्चा झाली होती. ईशाने एक पोस्ट लिहिली होती. तिने इंस्टाग्रामवर एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आफताब शिवदासानीसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कधीकधी तुम्ही गोष्टी सैल सोडल्या पाहिजेत आणि फक्त तुमच्या हृदयाच्या ठोक्यावर नाचले पाहिजे, असे म्हटले होते. 


दोन मुलींचे पालक आहेत ईशा आणि भरत


ईशा आणि भरत यांचा विवाह 2012 मध्ये झाला होता. आता दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ईशाने 29 जून 2012 रोजी भरत तख्तानी सोबत विवाह केला होता. मुंबईतील इस्कॉन मंदिरात दोघांचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला होता. वर्ष 2017 मध्ये त्यांना राध्या ही पहिली मुलगी झाली. त्यानंतर 2019 मध्ये दुसरी मुलगी मिराया हिचा जन्म झाला. 






इतर संबंधित बातम्या :