इशा देओल-भरत तख्तानीने 'नन्ही परी'चं नाव ठेवलं...
एबीपी माझा वेब टीम | 24 Oct 2017 09:38 AM (IST)
बाळाचं नाव आजी हेमा मालिनी, आजोबा धर्मेंद्र आणि तख्तानी कुटुंबाच्या पसंतीस उतरलं आहे. आठवड्याभरात मित्र आणि नातेवाईकांसोबत बाळाचं बारसं करण्यात येईल.
मुंबई : अभिनेत्री इशा देओलने सोमवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचं 'राध्या' असं नाव ठेवण्यात आलं आहे. इशा आणि तिचा पती भरत तख्तानी यांनी हे नाव ठरवलं. 'राधा' पासून राध्या हे नाव तयार करण्यात आलं आहे. राध्याचा अर्थ 'जिची पूजा करावी अशी' होत असल्याचं इशाच्या टीमने सांगितलं. बाळाचं नाव आजी हेमा मालिनी, आजोबा धर्मेंद्र आणि तख्तानी कुटुंबाच्या पसंतीस उतरलं आहे. आठवड्याभरात मित्र आणि नातेवाईकांसोबत बाळाचं बारसं करण्यात येईल. मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे इशाने मुलीला जन्म दिला. चित्रपटसृष्टी, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे भारावल्याची प्रतिक्रिया इशा आणि भरत यांनी दिली. दोघांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.