इक्बाल मिर्ची प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीची नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश
एबीपी माझा वेब टीम | 29 Oct 2019 10:11 AM (IST)
इकबाल मिर्ची कनेक्शन प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला ईडीने (सक्तवसुली संचालनालय) समन्स पाठविले आहे.
getty image
मुंबई : इकबाल मिर्ची कनेक्शन प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला ईडीने (सक्तवसुली संचालनालय) समन्स पाठविले आहे. चौकशी करण्यासाठी समन्स पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 4 नोव्हेंबर रोजी राज कुंद्रा कोर्टात हजर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ईडीला संशय आहे की, राज कुंद्राचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असावेत. इक्बाल मिर्ची या कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनसोबत राज कुंद्रा याने काही व्यावसायिक करार केले असल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबर रोजी राज कुंद्रा याची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, राज कुंद्राने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने इसेन्शियल हॉस्पिटॅलिटी मध्ये 44.11 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच 31.54 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्जदेखील दिलं आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 दरम्यान, इसेन्शियल हॉस्पिटॅलिटीला 30.45 कोटी आणि एप्रिल 2016 ते मार्च 2017 दरम्यान 117.17 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनी राज कुंद्रा याच्या मालकीची आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे. आरोप फेटाळताना राज कुंद्रा म्हणाला की, 2011 मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही. व्हिडीओ पाहा