Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी 2 या कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) हा सध्या रेव्ह पार्टीमुळे चर्चेत आहे.  हे सर्व प्रकरण 3 नोव्हेंबर रोजी सुरू झाले. जेव्हा नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध नोएडामधील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याबद्दल एफआयआर दाखल केला.आता एल्विश यादवनं   माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया  दिली आहे. तसेच एल्विशनं  नुकताच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये तो सांगतो की, मी  माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मेनका गांधी  (Maneka Gandhi) यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. 


माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मेनका गांधी यांनी रेव्ह पार्टी बस्ट प्रकरणात एल्विश यादवला अटक करण्याची मागणी करणारे निवेदन जारी केले होते.त्यांनी खुलासा केला की, त्यांच्या एनजीओने काही काळ एल्विश यादववर नजर ठेवली होती कारण तो त्याच्या व्हिडीओंमध्ये विषारी सापांचा वापर करत होता. आता एल्विश यादवनं हे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगून मेनका गांधी यांच्यावर टीका केली.


एल्विशनं एक ट्वीट देखील शेअर केलं होतं. या ट्वीटमघध्ये त्यानं लिहिलं होतं, "इस्कॉन पे इल्ज़ाम लगा दो,मुझ पे लगा दो,ऐसे मिलती है टिकट लोकसभा की?" या ट्वीटमध्ये त्यानं shame on maneka gandhi हा हॅशटॅग देखील वापरला आहे.






शनिवारी एल्विश यादवने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्लॉग शेअर केला. या व्लॉगमध्ये त्यांनी दावा केला आहे की, मेनका गांधी यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा खराब झाली असून याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. व्हिडिओमध्ये एल्विश म्हणाला, 'माझ्यावर आरोप करण्यात आले, मेनका गांधीजींनी मला सप्लायरचा प्रमुख बनवले. मानहानीची केस तर होणार भाऊ, मी असे सोडणार नाही. पूर्वी मला वाटायचं की, मी यासगळ्यात माझा वेळ वाया घालवत आहे. पण माझी प्रतिमा  मलिन झाल्यावर मी सोडणार नाही.'


नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान एल्विश यादवसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्हा दाखल झाल्यानंतर एल्विश यादवनं एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यानं सांगितलं की, माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं एल्विश म्हणाला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांना सहकार्य करण्यास तो तयार आहे.


संबंधित बातम्या


Elvish Yadav FIR : रेव्ह पार्टीत सापाचं विष, परदेशी मुलींचा 'सप्लाय', FIR नंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया