Iran Hijab Protest: इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता हिजाब विरोधी चळवळीचं लोण जगभरात पसरलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं लोक हिजाब विरोधी चळवळीत सामील होत आहेत, तुर्कस्तानची प्रसिद्ध गायिका मेलेक मोसोनं इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला. लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मेलेक मोसोनं (melek mosso) स्टेजवर स्वत:चे केस कापले आहेत. मेलेकचा हा कॉन्सर्टमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


मेलेकनं भर कार्यक्रमात कापले केस 


व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गायिका मेलेक ही भर कार्यक्रमात स्टेजवर कात्रीनं केस कापत आहे. मेलेकनं स्टेजवर स्वत:चे केस कापून हिजाब विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला. व्हिडीओमध्ये प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज देखील येत आहे. मेलेकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


पाहा व्हिडीओ






महिलांचा कायद्याविरोधात एल्गार, केस कापले, हिजाब जाळला  


सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि फोटोंमध्ये तेहरान तसेच देशातील इतर शहरांमधील आंदोलक सरकारच्या कठोर कायद्यांबद्दल निषेध व्यक्त करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावरील काही व्हिडिओमध्ये अशा महिला आहेत ज्या देशाच्या कायद्याच्या विरोधात आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ आणि फोटोमध्ये महिला या आपले केस कापून, हिजाब जाळतानाही दिसून येत आहेत. 


अटकेतील महिलेच्या मृत्यूनंतर आंदोलनाला सुरुवात


महसा अमिनीला हिजाब न परिधान केल्या प्रकरणी इराणच्या पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी अटक केली. त्यानंतर पोलीस कोठडीत असताना तिची तब्येत इतकी बिघडली आणि ती कोमात गेली, त्यानंतर महसा अमिनीचा मृत्यू झाला. पोलिस अटकेत असताना या महिलेचा मृत्यू झाल्यानं महिलांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनं करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या अटकेत असताना महसा अमिनीचा मृत्यू झाला. यानंतर इराणमधील महिलांनी हिजाब विरोधी भूमिका घेत आंदोलनं करण्यास सुरुवात केली.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Iran : हिजाब विरोधी आंदोलन 80 शहरांमध्ये पसरलं, निदर्शनांमुळे आतापर्यंत 40 हून अधिक लोकांचा मृत्यू