मुंबई : भारतातील महिला चित्रपट रसिकांचा 'नॅशनल क्रश' अशी ख्याती असलेला अभिनेता विकी कौशलचं ब्रेकअप झालं आहे. सध्या 'एकदम सिंगल' असल्याचं विकीने कबूल केलं आहे. त्यामुळे हरलीन सेठीसोबतच्या कथित प्रेमप्रकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

गेल्या वर्षभरात विकी कौशलने चांगलंच व्यावसायिक यश कमावलं. संजू, उरी : द सर्जिकल स्ट्राईक यासारख्या त्याच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवतानाच प्रेक्षकांची वाहवासुद्धा मिळवली. त्यासोबत 'लस्ट स्टोरीज, लव्ह पर स्क्वेअर फूट' यासारख्या वेब सीरीजही चर्चेत होत्या. त्याचवेळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही काहीतरी शिजत असल्याचा सुगावा चाणाक्ष प्रेक्षकांना लागला.

विकी हा समस्त तरुणींचा 'हार्टथ्रोब' असल्यामुळे तो रिलेशनशीपमध्ये असल्याचं कळताच अनेकींचा 'हार्टब्रेक'ही झाला खरा. मात्र हरलीनसोबतची त्याची जोडीही अनेकांच्या पसंतीस उतरली होती. 'कॉफी विथ करण'च्या एपिसोडमध्ये विकीने आपण डेटिंग करत असल्याचं संकेत दिले. दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली कधी दिली नसली, तरी 'उरी'च्या यशानंतर त्याने हरलीनसोबतचे फोटो शेअर करुन यावर शिक्कामोर्तबच केलं.
विकी कौशलसोबतच्या रिलेशनशीपवर हरलीनकडून शिक्कामोर्तब?

हरलीन सेठीने यापूर्वी काही जाहिरातींमध्ये काम केलं आहे. 'अल्टबालाजी'च्या 'ब्रोकन बट ब्यूटिफूल' या वेब सीरिजमध्येही हरलीन विक्रांत मस्सीसोबत झळकली होती.


काही दिवसांपूर्वी हरलीनच्या 'सॅड इन्स्टाग्राम पोस्ट्स' आणि विकीला तिने अनफॉलो केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विकी-हरलीनच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. भूमी पेडणेकर आणि कतरिना कैफशी जवळीक साधल्यामुळे विकीचं ब्रेकअप झाल्याचंही म्हटलं जाऊ लागलं.


एका पुरस्कार सोहळ्यात विकीला रिलेशनशीप स्टेटसबद्दल छेडलं असता 'हो तर, एकदम सिंगल आहे आता, बघा... एकटा...' असं उत्तर त्याने दिलं. 'सिंगलचा मिंगल होण्याची इच्छा आहे का?' हा प्रश्न मात्र त्याने मिश्किल उत्तर देत टोलवून लावला.