मुंबई : वेस्ट इंडीजचा धडाकेबाज क्रिकेटर ड्वेन ब्राव्हो लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. ‘तुम बिन 2’ सिनेमात ब्राव्हो एक गणं गाणार असून, बॉलिवूड पदार्पणातील हा ब्राव्होचा पहिला सिनेमा आहे. ‘तुम बिन 2’ सिनेमात आदित्य सील, आशिम गुलाटीही दिसणार आहेत.
https://twitter.com/DJBravo47/status/768821238810554368
‘तुम बिन 2’ या सिनेमाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आहेत. अनुभव सिन्हा यांनीच आधीच्या ‘तुम बिन’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. सुपरस्टार शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘रा वन’ सिनेमाही सिन्हा यांचाच होता.
भारताबाहेरील क्रिकेटर्सपैकी ब्रेट लीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यामुळे एकामागोमाग एक असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स बॉलिवूडच्या प्रेमात पडताना दिसत आहेत.