नवी दिल्ली : बॉबी देओलचं अॅक्टिंग करिअर कधीच संपुष्टात आलं, त्यामुळे तो आता नव्या भूमिकेत दिसत आहे. ही भूमिका म्हणजे डीजेची. परंतु डीजेमध्येही त्याला फारसं यश मिळताना दिसत नाही. याचा अनुभव मागील महिन्यात दिल्लीतील क्बलमध्ये आला.


 

दिल्लीतील अतिशय उच्चभ्रू क्लबमध्ये बॉबी देओलने डीजे म्हणून पहिल्यांदाच काम सुरु केलं. 1997 मधल्या त्याच्याच गुप्त या सिनेमातील गाण्याने धडाक्याने सुरुवात केली. पण तिथल्या श्रोत्यांना हे गाणं फारसं रुचलं नाही आणि त्यांनी चक्क रिफंडची मागणी केली.

 

बॉबी देओल ट्रॅक मिक्सिंग करण्याचं प्रशिक्षण घेत आहे. त्यानंतर दिल्लीतल्या या क्लबने त्याला डीजे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर डीजे नाईटच्या तिकीटांची अॅडव्हान्समध्ये विक्रीही झाली होती. कार्यक्रमाच्या दिवशी पाहुणे क्लबमध्ये आले. त्यानंतर बॉबीने त्याच्या सिनेमातील गाण्याने सुरुवात केली, पण संपूर्ण कार्यक्रमभर तिच गाणी वाजवल्याने श्रोते नाराज झाले.

 

"बॉबीचा पहिलाच कार्यक्रम म्हणून तिकीटांची आधीच विक्री झाली होती. त्यानंतर 1997 मधल्या गुप्त सिनेमातील गाणं वाजवण्यास सुरुवात केली. पण तेच गाणं पहाटेपर्यंत सुरु ठेवलं होतं. यामुळे पाहुणे अतिशय नाराज झाले. काहींनी तर मॅनेजर आणि हॉटेल स्टाफकडून रिफंडची मागणी केली. या डीजे नाईटच्या तिकीटांचे दर 2500 ते 4000 पर्यंत होते. मात्र श्रोत्यांनी गोंधळ घालण्याआधीच बॉबी हॉटेलमधून निघून गेला होता," अशी माहिती सुत्रांनी दिली.