Marathi Movies : मराठी चित्रपटगृहांना प्रदर्शनाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर 'जयंती' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जयंती सिनेमा 26 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. सरकारने सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सिनेसृष्टीत आनंदमय वातावरण निर्माण निर्माण झाले होते. लॉकडाउनमुळे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन सिनेमे पाहता येत नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अशातच मराठी सिनेवर्तुळात मात्र सावधगिरीने पाऊले टाकली जात आहेत. 


सरकारने सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मराठी सिनेमांचे बजेट कमी असल्याने निर्मात्यांना राज्यसरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक फटका बसणारच होता. अशातच बॉलिवूडच्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखांमुळे मराठी सिनेमांच्या तारखा बदलण्यात येत आहेत. मराठीतील 'जयंती' सिनेमाची तारीख 26 नोव्हेंबर ठेवण्यात आली होती. सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख आठ आठवडे आधीच जाहीर करण्यात आली होती. अशातच बॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा 'अंतिम' 26 नोव्हेंबरलाच प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे महाराष्ट्रात पुन्हा मराठी चित्रपत्रांची गळचेपी होताना दिसून येत आहे. 


26 नोव्हेंबरला येणाऱ्या 'अंतिम' या बॉलिवूड चित्रपटामुळे मराठीतील 'जयंती' सिनेमाला मात्र चांगलाच फटका बसला आहे. पण जर जयंतीने सिनेमा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असती तर नंतर मराठीतील अनेक सिनेमांनादेखील आर्थिक फटका बसला असता. जयंतीनंतर मराठीतील गोदावरी, झिम्मा सिनेमा प्रदर्शित होणार होते. त्यामुळेच 'जयंती' सिनेमाच्या निर्मात्यांनी इतर मराठी सिनेमांचा विचार करत 12 नोव्हेंबरला सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जयंती सिनेमा 26 नोव्हेंरला प्रदर्शित न होता 12 नोव्हेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित "जयंती" हा एका नव्या धाटणीचा विषय असलेला बहुचर्चित सिनेमा आहे.


Marathi Movies Release : सणासुदीच्या काळात सिनेमागृहात 'हे' मराठी चित्रपट धमाका करणार!


जयंती सिनेमानंतर 19 नोव्हेंबरला 'झिम्मा' सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पाहता येणार आहे. 'झिम्मा' चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, छोटी सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या सर्व अभिनेत्रींसोबत चित्रपटाची शान वाढवायला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकरदेखील दिसणार आहे. त्यानंतर गोदावरी सिनेमा येत्या 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. जितेंद्र जोशी, नीणा कुलकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोकले या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत. गोदावरी चित्रपटगृहाचे आंतरराष्ट्रीय समीक्षणदेखील करण्यात आले आहे. गोदावरी सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता जितेंद्र जोशी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे.