श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी
एबीपी माझा वेब टीम | 27 Feb 2018 08:04 AM (IST)
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी तिचे पती बोनी कपूर यांची काल (सोमवार) दुबई पोलिसांनी चौकशी केली.
दुबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी तिचे पती बोनी कपूर यांची काल (सोमवार) दुबई पोलिसांनी चौकशी केली. काही वेळेच्या चौकशीनंतर बोनी कपूर यांना पोलिसांनी सोडून दिल्याची माहिती मिळते आहे. श्रीदेवीच्या मृत्यूवेळी बोनी कपूर कुठं होते? याची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. शिवाय श्रीदेवीचे कॉल रेकॉर्ड्सची तपासणीही पोलिसांकडून करण्यात येणार आहे.