Drishyam 3 : अभिनेते मोहनलाल (Mohanlal) यांच्या दृश्यम (Drishyam) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग रिलीज झाले आहेत. या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. दृश्यम-3 (Drishyam 3) रिलीज होणार की नाही? असा प्रश्न मोहनलाल यांच्या चाहत्यांना पडला होता. आता क्राईम थ्रिलर असणाऱ्या दृश्यम या चित्रपटाचा तिसऱ्या भागाची निर्माते अँटोनी पेरुम्बावूर यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे. माझविल एंटरटेनमेंट अवॉर्ड्स या कार्यक्रमामध्ये अँटोनी पेरुम्बावूर (Antony Perumbavoor) यांनी 'दृश्यम-3' बाबत माहिती दिली आहे.
अँटोनी पेरुम्बावूर यांनी 'दृश्यम-3' ची घोषणा केल्यानंतर ट्विटरवर Drishyam 3 हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी अँटोनी पेरुम्बावूर यांचा पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्यानं ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करुन लिहिले, 'आता दृश्यम-3 ची अधिकृतपणे घोषणा झाली आहे.' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'क्लासिक क्रिमिनल पुन्हा येतोय... दृश्यम- 3 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. '
पाहा नेटकऱ्यांचे ट्विट्स
2013 मध्ये दिग्दर्शक जीतू जोसेफ यांचा दृश्यम हा क्राईम थ्रिलर मल्याळम चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर या चित्रपटाचा रिमेक कन्नड, तामिळ, तेलुगु आणि हिंदी या भाषांमध्ये करण्यात आला. दृश्यम चित्रपटाच्या यशानंतर दृश्यम-2 ची निर्मिती करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला. 2021 मध्ये दृश्यम-2 रिलीज झाला. दृश्यम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता अजय देवगणनं प्रमुख भूमिका साकारली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: