देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे आता कमी होऊ लागली आहेत. मात्र, कोरोनाची दुसरी लाट अजूनही विनाशकारी आहे. आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल'मध्ये काम करणारी अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभा यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ती अखेरीस 'हॅलो चार्ली' चित्रपटात दिसली होती. ती व्हिशलिंग वुड्समधून पदव्युत्तर होती. टीव्ही कॉमेडी शो 'चिडीयाघर' मध्येही तिने काम केलंय.
रिंकू सिंह निकुंभची चुलत बहीण चंदासिंह निकुंभने बॉलिवूड लाइफला सांगितले की, "तिचा कोरोनाचा अहवाल 25 मे रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला घरीच क्वारंटाईन करण्यात आले. तेव्हापासून तिचा ताप कमी झाला नाही. आम्ही काही दिवसांपूर्वी तिला रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. सुरुवातील तिला आयसीयूची गरज नसल्याने तिला सामान्य वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते.
आयसीयूमध्ये केलं होतं शिफ्ट
चंदा सिंह यांनी सांगितले, त्याच्या दुसर्या दिवशी तिला आयसीयूमध्ये हलविण्यात आले. आयसीयूमध्ये तिची तब्येत सुधारत होती. तिचे निधन झाले त्यादिवशीही तिची तब्येत ठीक होती. शेवटी तिने आशा सोडली. तिला वाटले की ती जगू शकणार नाही, तिला दम्याचाही आजार होता.
चंदाने हेही सांगितले की रिंकूने 7 मे रोजी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता आणि लवकरच ती दुसरा डोस घेणार होती.
घरात कोरोनाचा संसर्ग
रिंकूसिंह निकुंभची आठवण सांगृताना चंदासिंह निकुंभ म्हणाली, "ती खूप आनंदी आणि एनर्जेटीक होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हासुद्धा ती लोकांची मदत करत होती." चंदा पुढे म्हणाली की ती नुकतीच शूटसाठी गोव्याला जात होती. पण कोविड 19 च्या संसर्गामुळे आम्ही तिला थांबवले. तिला घरातच संसर्ग झाला. तिच्या घरातील बर्याच लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्हवर आले जे अद्याप बरे झाले नाहीत.
ड्रीम गर्ल चित्रपटातील अभिनयाचे कौतुक
अभिनेता आयुष्मान खुराणासोबत ड्रीम गर्ल चित्रपटात रिंकूसिंह निकुंभने उत्कृष्ट अभिनय केला आहे. चित्रपट समिक्षकांनी या अभिनयासाठी तिचं भरभरुन कौतुक केलं होतं. या चित्रपटामुळे तिची इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण झाली होती. तिला नवनवीन चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या.