Drashti Dhami Announce Pregnancy : छोट्या पडद्यावर 'मधुबाला' (Madhubala) या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दृष्टी धामीने गुड न्यूज दिली आहे. दृष्टी धामीने (Drashti Dhami) आपण आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. लग्नाच्या 9 वर्षानंतर दृष्टी धामी गरोदर असून 38 व्या वर्षी आई होणार आहे. दृष्टी धामीने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 


 लग्नाच्या 9 वर्षानंतर आई होणार दृष्टी... 


टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री दृष्टी धामी लग्नाच्या नऊ वर्षानंतर गरोदर राहिली आहे.  अभिनेत्री दृष्टीने सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. दृष्टीने व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दृष्टी धामी आणि तिच्या नवऱ्याने व्हाईट टी-शर्ट परिधान केला आहे. दृष्टीच्या टी-शर्टवर 'आई बनण्याची तयारी', तर नीरजच्या टी-शर्टवर लिहिले आहे- 'पापा बनण्याची तयारी' असे लिहिले आहे. या जोडप्याने हातात एक बोर्ड धरला असून ऑक्टोबर महिन्यात बाळाचे स्वागत करणार असल्याची बातमी त्यांनी दिली आहे. 







शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दृष्टी धामी आणि तिचा नवरा नीरज यांच्या हातात वाईनचा ग्लास असल्याचे दिसत आहे, मात्र त्यानंतर तिचे कुटुंबीय त्यांच्या हातातून वाइन ग्लास घेतात आणि त्यांना दुधाची बाटली देतात. एक पोस्टर शेअर करतात. 


ऑक्टोबरमध्ये होणार बाळाचे स्वागत...


व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दृष्टी धामीने लिहिले की, 'फार दूर नाही, लवकरच एक लहान बाळ आमच्यासोबत येत आहे. कृपया आम्हाला प्रेम, आशीर्वाद आणि फ्रेंच फ्राईज पाठवा. ऑक्टोबरची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. 


अभिनेत्रीच्या या पोस्टवर अंकिता लोखंडे आणि मौनी रॉयसह अनेक स्टार्सनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दृष्टी आणि नीरजने 2015 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.