Alia Bhatt On Trolling : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) सिनेमामुळे तसेच प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. आलियाने नावापुढे कपूर आडनाव लावल्याने तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. आलियाला तिच्या कामामुळे किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण आता "मी आवडत नसेल तर माझे सिनेमे पाहू नका" असं म्हणत आलियाने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. 


स्टार किडला अनेकदा ट्रोल करण्यात येत असते. करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द इयर' या सिनेमाच्या माध्यमातून आलियाने 2012 साली सिनेसृष्टीत पदार्णण केलं. आलिया पहिल्याच सिनेमात मुख्य भूमिकेत असल्याने तिला ट्रोल करण्यात आले. नुकत्याच एका मुलाखतीत आलिया म्हणाली,"माझे आई-वडील सिनेसृष्टीत काम करतात यात माझी काय चूक. उद्या जर कोणत्या अभिनेत्याच्या, अभिनेत्रीच्या मुलांना सिनेसृष्टीत पदार्पण करायचं असेल तर त्यांना स्वत:ला सिद्ध करावं लागेल". 






रणबीर-आलियाचा पहिला सिनेमा


आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकून चाहतेही खूप उत्सुक आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच आलिया भट्टचा चित्रपट ‘डार्लिंग्स’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. आता रणबीर आणि आलियाचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ पुढच्या महिन्यात थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या दोघांचा एकत्र असा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरूनच दोघांची प्रेमकहाणी सुरु झाली होती.


नुकताच रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट काही खास कमाई करू शकला नाही. आता अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रणबीरसाठी लकी ठरेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, चैतन्य अक्किनेनी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


संबंधित बातम्या


Rajjo : सेलेस्टी बैरागीनं सांगितलं 'रज्जो' मध्ये मुख्य भूमिका मिळवण्यामागचे आलिया भट्ट कनेक्शन! 


Alia Bhatt : आलिया भट्टच्या डिलिव्हरी डेटची चर्चा, ‘या’ महिन्यात कपूर घराण्यात होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन!