Pushpa 2 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) हा सिनेमा 17 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक 'पुष्पा 2' (Pushpa 2) म्हणजेच 'पुष्पा: द रूल' (Pushpa The Rule) या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'पुष्पा द रुल' या सिनेमाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. 


'पुष्पा: द रूल' या सिनेमात 'पुष्पा: द राइज' प्रमाणेच प्रेक्षकांना नाट्य, अॅक्शन आणि थ्रिल बघायला मिळणार आहे. 'पुष्पा: द रूल' हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमातील डायलॉग, कथानक आणि सिनेमातील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या सिनेमाने सिनेमागृहात 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यामुळे 'पुष्पा 2' किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 






'पुष्पा 2' 2023 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा: द रूल' हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन, फहाद फाजिल आणि रश्मिका मंदान्ना हे पहिल्या भागातील कलाकार दिसणार आहेत. तसेच 'पुष्पा 2'मध्ये विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.  आज 22 ऑगस्ट 2022 रोजी 'पुष्पा: द रूल' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. 


'पुष्पा: द रूल'चे बजेट 500 कोटी


'पुष्पा: द रूल' या सिनेमाची निर्मिती 500 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात येणार आहे. निर्माते या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 500 कोटी खर्च करणार आहेत. हा सिनेमा 10 भाषांमध्ये रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याने प्रेक्षक 'पुष्पा: द रूल'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच सिनेमागृहात 'पुष्पा: द रूल' हा सिनेमा धमाका करणार आहे. 


संबंधित बातम्या


Allu Arjun Pushpa 2 : 'पुष्पा : द रुल'साठी अल्लू अर्जूनने वाढवली फी; भाग 1 च्या दुप्पट किंमतीत करणार काम


Pushpa The Rule : अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या 'पुष्पा: द रूल' मध्ये होणार 'या' साऊथ सुपरस्टारची एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका