पाकिस्तानच्या या गायिकेचा अमिताभ झाला फॅन
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2016 10:05 AM (IST)
मुंबई: महानायक अमिताभ बच्चन एका पाकिस्तानी गायिकेचा चाहता बनला आहे. अमिताभ यांनी त्यांच्या 'पिंक' या आगामी चित्रपटातील गाणे फेसबूक पेजवर शेअर केले आहे. या गाण्याचे 'कारी-कारी' असे शब्द आहेत. हे गाणे पाकिस्तानची प्रसिद्ध गायिका कुर्त-उल-एन बलोच यांनी आवाज दिला आहे. या गाण्यात तापसी पन्नू, किर्ती कुल्हारी आणि आन्द्रिया या अभिनेत्रींनी परफॉर्म केले आहे. हे गाणे तनवीर गाजी यांनी लिहले आहे. 'पिंक' हा अमिताभ बच्चन यांचा सस्पेंस थ्रिलर चित्रपट असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध राय चौधरी यांनी केले आहे. हा चित्रपट 16 सप्टेंबर 2016 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या गाण्याचा व्हिडीओ पाहा