Kareena Kapoor On Diwali: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने दिवाळीच्या मुहुर्तावर एक क्युट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. करीनाने सोशल मीडियावर सैफ अली खान जेहसोबत खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. जेह आणि सैफ अली खानच्या फोटोवर चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. करीनाने हा फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले आहे,"लव अॅन्ड लाइट".


जेह आणि सैफ अली खान बागेत खेळताना दिसून येत आहेत. फोटोमध्ये जेह आणि सैफ अली खानच्या आसपास खेळणी दिसून येत आहेत. दोघेही मजा करत आहेत. तो मजा-मस्तीचा करतानाचा फोटो करीनाने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.






Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात दिवाळीनिमित्त आज कुणीतरी येणार..


करीनाने शेअर केलेल्या जेह आणि सैफ अली खानच्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. याआधीदेखील करीनाने जेहचा फोटो शेअर केला होता. या फोटोत जेह योगा करताना दिसून येत होता. 


Kangana Ranaut Viral Video: भर कार्यक्रमात जेव्हा कंगनाने करण जोहरला इग्नोर केलं, पहा व्हिडीओ


करीना कपूर लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात दिसून येणार आहे. 'लाल सिंह चड्ढा' हा एका हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. या सिनेमात करिना कपूरसोबत मोना सिंह, अतुल कुलकर्णीदेखील दिसून आहेत. 'तख्त' हा देखील करीनाचा आगामी सिनेमा आहे. करण जोहरच्या तख्त सिनेमात करीना कपूर व्यतिरिक्त रणवीर सिंह, विक्की कौशल, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूरदेखील दिसून येणार आहेत.


Sooryavanshi: रोहीत शेट्टीच्या 'या' चित्रपटांनी दिवाळीत केला होता धमाका! यंदाही तोच प्लॅन