Kangana Viral Video: जर तुम्हाला कोणी विचारले की असं कोण आहे जो चित्रपट निर्माता करण जोहरशी (Karan Johar) पंगा घेण्याची एकही संधी सोडत नाही, तर त्याचं उत्तर आहे बॉलिवूड क्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut). कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा साधला आहे. कंगनाने एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कंगना अवॉर्ड शोमध्ये करणकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 2007 चा आहे. कंगना त्यावेळी बॉलिवूडमध्ये नवीन होती. व्हिडीओ शेअर करत कंगनाने सुरुवातीपासूनच तिचा दृष्टिकोन वाईट असल्याचे मान्य केले आहे. कंगनाचे चाहते आता हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत.


कंगनाकडून आपला अॅटीट्यूड वाईट मान्य
ट्विटरवर अकाऊंट सस्पेंड झाल्यापासून कंगना इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. जर तुम्ही तिने शेअर केलेला नवीन व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल की कंगना फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये होस्ट बनलेल्या करणकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. करण जाहीर करतो की, "हा पुरस्कार सार्वजनिक सर्वेक्षणाद्वारे ठरविण्यात आला आहे आणि मी गेल्या तीन वर्षांपासून तो जिंकत आहे. यानंतर कंगनाला विजेता घोषित करण्यात आले. आणि ती स्टेजवर ट्रॉफी घेताना दिसत आहे.


कामाबद्दल बोलायचे झाले तर कंगना रनौत अखेरीस 'थलायवी' (Thalaivii) चित्रपटात दिसली होती. आता कंगना लवकरच 'धाकड' (Dhaakad), 'तेजस' (Tejas) आणि 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटांशिवाय कंगना 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिड्डा' (Manikarnika Returns: The Legend of Didda) आणि 'सीता- द इनकार्नेशन'मध्येही (Sita the Incarnation) काम करणार आहे. यासोबतच कंगना टिकू वेड्स शेरूची निर्मिती करत आहे.