मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं मूळ नाव अनुसया आहे. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिलं होतं.
प्रेमासाठी वाट्टेल ते, आम्ही जातो आमच्या गावा, भालू हे उमा भेंडे यांचे गाजलेले सिनेमे आहेत. त्यांनी मराठीसह अनेक हिंदी सिनेमांतही काम केलेलं आहे. त्या मूळ कोल्हापूरच्या होत्या.
70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अशी उमा भेंडे यांची ओळख होती. त्यांनी आपल्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. दोस्ती हा त्यांचा गाजलेला हिंदी सिनेमा आहे.
आजारामुळे उमा भेंडे यांचं निधन झालं. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना हृदयाचा त्रास होता, अशी माहिती आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2017 03:33 PM (IST)
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं मूळ नाव अनुसया आहे. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -