Chhello Show: ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेल्या 'छेल्लो शो' (Chhello Show)   या चित्रपटाला 'आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीत स्थान मिळाले आहे. या चित्रपटाच्या टीमचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. पण काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक पान नलिन (Pan Nalin) यांनी सांगितलं की, त्यांनी काही लोक धमकी देत होते. तसेच त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं होतं. 


एका मुलाखतीमध्ये  दिग्दर्शक पान नील यांनी सांगितलं की, ऑस्करमध्ये  छेल्लो शो हा शॉर्टलिस्ट झाल्यानं ते खूप आनंदी होते. पण काही लोक त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप  करुन त्यांना ट्रोल करत होते. पुढे त्यांनी सांगितलं,'आमचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सायबर अटॅकचा सामना करत होता. ऑस्करमधून चित्रपट काढून टाका, नाहीतर बरे होणार नाही अशी धमकी  माझ्या टीमला देण्यात आली. अमेरिकेत सेलिब्रेशन  आणि चित्रपटाचा प्रचार करण्याऐवजी आम्ही तीन-चार आठवडे या विषयात  व्यस्त होतो.'


'पण नंतर काही फिल्म क्रिटिक्सनं कौतुक केल्यानंतर लोकांनी हा चित्रपट पाहिला, तेव्हा अनेकांनी तो आवडला. शेवटी सिनेमाचा विजय झाला.' असंही दिग्दर्शक पान नील यांनी सांगितलं. 






काय आहे चित्रपटाचे कथानक? 


छेल्लो शो या  चित्रपटाची कथा एका ग्रामीण भागातील नऊ वर्षाच्या मुलाभोवती फिरते ज्याचे चित्रपटावर अफाट प्रेम असते.  या चित्रपटामध्ये भावेश श्रीमाली, भाविन राबरी, ऋचा मीणा, परेश मेहता आणि दीपेन रावल मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट पहिल्यांदा ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला होता.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhello Show : ‘छेल्लो शो’, प्रकाश ओंजळीत भरण्याची स्वप्न पाहणाऱ्या ‘समय’ची कथा!