Badshah: प्रसिद्ध रॅपर बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. बादशाहच्या कॉन्सर्टचं आयोजन 24 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये करण्यात आलं आहे. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये हे कॉन्सर्ट होणार आहे. कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत 999 पासून सुरु होते. पण 999 रुपयांचे सर्व तिकीट विकले गेले आहेत.  या कॉन्सर्टचं सर्वात महाग तिकीट हे 6 लाख रुपयांचे आहे.  'पागल' नावाच्या या कॉन्सर्टमधील बदाशाहच्या  लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी आता लोकांना लाखो रुपये मोजावे लागणार आहेत. काही नेटकऱ्यांनी बादशाहच्या या कॉन्सर्टच्या तिकीटाच्या किंमतींवर प्रतिक्रिया दिली आहे. 


नेटकऱ्यांनी शेअर केले मिम्स:
बादशाहच्या कॉन्सर्टच्या किंमती पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी मिम्स तयार केले आहेत. 'बादशाहच्या कॉन्सर्टचं सहा लाखचं तिकीट खरेदी करण्यासाठी शेअर्स विकायला आलो होते.' असं ट्वीट एका नेटकऱ्यानं शेअर केलं आहे.  


पाहा नेटकऱ्यांचे भन्नाट मिम्स: 














आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया हे बादशाहचं खरं नाव आहे. 2006 साली त्यानं संगीतक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. लाल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, हाय गरमी, लेट्स नाचो या बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.


 बादशाह हा  हनी सिंहच्या हिप हॉप ग्रुपमध्ये सामील झाला. त्यानंतर 2012 मध्ये दोघे वेगळे झाले. नंतर बादशाहने 'कर गई चुल' हे गाणे रिलीज केले. हे गाणे 'कपूर अँड सन्स' चित्रपटात बादशाहनं वापरले गेले. 2015 मध्ये बादशादचं 'डीजे वाले बाबू' हे गाणं रिलीज झालं. हे गाणे प्रचंड गाजले. 2018 मध्ये, बादशाहने त्याचा पहिला अल्बम 'ओरिजिनल नेव्हर एंड्स' (O.N.E.) रिलीज केला. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Rapper Badshah Birthday: कोट्यवधींचा मालक बादशाह! वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत