Mani Ratnam : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. बॉलिवूडसह छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत आहे. आता दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांचे दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


मणिरत्नम यांची पत्नी सुहासिनी यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अद्याप मेडिकल बुलेटिन समोर आलेले नसून मणिरत्नम यांच्या प्रकृतीसंदर्भात कोणतीही माहिती चाहत्यांना मिळालेली नाही. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात मणिरत्नम यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


मणिरत्नम सध्या त्यांच्या आगामी 'पोन्नियिन सेल्वन' सिनेमामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चनचा लूक समोर आलेला असून या सिनेमाचा टीझरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 






मणिरत्नम यांचा आगामी सिनेमा


मणिरत्नमचा 'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. अशातच मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. 


30 सप्टेंबरला सिनेमा होणार रिलीज


'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी  1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Ponniyin Selvan Teaser : 'पोन्नियिन सेल्वन'चा टीझर आऊट; ऐश्वर्या रायचा राजेशाही लूक


Ponniyin Selvan-1 : ऐश्वर्याच्या 'पोन्नियन सेलवन' ची रिलीज डेट जाहीर ; फर्स्ट लूक चर्चेत