Brahmastra 2 Release Date : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. त्याची झलक बॉक्स ऑफिसवर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने आठवडा पूर्ण होण्याआधीच 200 कोटींचा गल्ला पार केला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता चाहते ‘ब्रह्मास्त्र 2’ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अर्थात ‘ब्रह्मास्त्र 2 : देव’ (Brahmastra 2) या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दुसऱ्या भागात रणवीर सिंह (Ranveer Singh), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) झळकणार आहेत. ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर चाहते याचा दुसरा आणि तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार, असा सवाल करत आहेत. तर, अयान मुखर्जीने नुकतेच एका मुलाखतीत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.


चित्रपटाच्या दुसऱ्या भागाविषयी बोलताना अयान मुखर्जी म्हणाला, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दुसरा (Brahmastra 2) ) भाग डिसेंबर 2025पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. मात्र, यावेळी अयानने नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. अयान म्हणाला की, पुढच्या 3 वर्षांत हा चित्रपट बनवून प्रदर्शित करायचा, हे आमचे टार्गेट आहे. अर्थात हे टार्गेट जुळवणे मेकर्ससाठी कठीण जाईल. कारण या चित्रपटाचा पहिला भाग बनवायलाच खूप वेळ लागला. मात्र, आता असे चित्रपट कसे बनतात हे जाणून घेतले.


काहीकाळ विश्रांतीची गरज


या चित्रपटासंदर्भात माहिती देताना अयान म्हणाला की, दुसऱ्या भागाच्या कथेवर आधीपासूनच काम सुरु झालेले आहे. या दरम्यान कथेत अनेक बदल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान यावर काम करण्यासाठी बराच वेळ मिळाल्याचे अयान म्हणाला. शिवाय, पहिल्या भागाच्या रिलीजनंतर आता टीमला काही काळ विश्रांतीची गरज आहे. त्यानंतर नवीन काम सुरु करणार असल्याचे तो म्हणाला.


नव्या चेहऱ्यांची चर्चा


‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये रणबीर कपूरच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रणवीर सिंह किंवा हृतिक रोशन मुख्य भूमिकेत एन्ट्री घेऊ शकतात. मात्र, अद्याप मेकर्सनी यावर कोणताही खुलासा दिलेला नाही. तर, ‘ब्रह्मास्त्र’ रिलीजच्या आधीही हृतिक रोशन आणि रणवीर सिंह यांच्या नावाची जोरदार चर्चा होती.


‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे, तर दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. चित्रपटाचे बजेट 400 कोटींहून अधिक आहे. हा चित्रपट भारतातच पाच हजारांहून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. भारताशिवाय परदेशातही तीन हजारांहून अधिक स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :