Dipika Kakar: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिका आणि शोएब यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
शोएब आणि दीपिका यांनी त्यांचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये दिसत आहे की, त्या दोघांनी 'मॉम टू बी' आणि 'डॅड टू बी' असं लिहिलेली टोपी घातलेली आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि अस्वस्थता या भावनांनी बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहोत आमच्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर टप्पा आहे. लवकरच आम्ही पालक होणार आहोत. तुमच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची आम्हाला गरज आहे.'
शोएब आणि दीपिका यांच्या चाहत्यांनी आणि गौहर खान, चारु असोपा, मनिंदर सिंह या सेलिब्रिटींनी या पोस्टला कमेंट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 22 फेब्रुवारी 2018 रोजी शोएब आणि दीपिका यांनी लग्नगाठ बांधली. दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
पाहा पोस्ट:
दीपिकानं 2011 मध्ये रौनक मेहतासोबत लग्नगाठ बांधली. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. रौनक आणि दीपिकाचा 2015 मध्ये घटस्फोट झाला. ससुराल सिमर का या मालिकेमुळे दीपिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेमध्ये तिनं सिमर ही भूमिका साकारली होती. शोएबनं देखील ससुराल सिमर का या कार्यक्रमामध्ये प्रेम ही भूमिका साकारली होती. या कार्यक्रमामधील शोएब आणि दीपिका यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: