Diljit Dosanjh Joins Border 2 : 'बॉर्डर 2' चित्रपटात अभिनेता वरुण धवननंतर (Varun Dhavan) आता पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) हा 'बॉर्डर-2' चा हिस्सा असणार आहे. दिलजीत हा चित्रपटात तिसरा मुख्य अभिनेता असणार आहे. चित्रपटाच्या टीमने याची घौषणा केली. दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली. 


दिलजीत दोसांझने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'बॉर्डर 2' चा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यासोबत म्ह़टले की, शत्रूकडून पहिली गोळी सोडली  जाईल आणि शेवटची गोळी आमची असेल. एका पॉवरफुल टीमसोबत उभं राहणे आणि आपल्या सैनिकाच्या पावलावर पाऊल ठेवणे ही सन्मानाची बाब आहे. 


सनी देओल आणि वरुण धवनने केले स्वागत...


सनी देओल आणि वरुण धवननेही 'बॉर्डर 2'मध्ये दिलजीत दोसांझचे स्वागत केले आणि व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'फौजी दिलजीत दोसांझचे स्वागत करतो.' चाहत्यांनी दिलजीतचे अभिनंदन केले असून चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी चांगलेच उत्सुक आहेत. 






'केसरी' फेम अनुराग सिंह आहेत दिग्दर्शक


अक्षय कुमारची भूमिका असलेल्या केसरी या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंह हे बॉर्डर-2 चे दिग्दर्शन करत आहेत. 'बॉर्डर-2' हा 1997 मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर या चित्रपटाचा सिक्वेल आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन जे.पी. दत्ता यांनी केले होते. 


बॉर्डर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. बॉर्डर चित्रपटात अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, कुलभूषण खरबंदा, पुनित इस्सार, पूजा भट्ट, शरबानी मुखर्जी आणि तब्बू यांच्यासह अनेक  कलाकारांच्या भूमिका होत्या. 'बॉर्डर 2'ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी संयुक्तपणे केली आहे. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.