Guess Bollywood Actress : बॉलिवूड सेलिब्रिटींची रिल आणि रिअल लाईफ तितकीच चर्चेत असते. अनेक वेळा सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. ही अभिनेत्री लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट झाली होती. ही बाब कुटुंबियांना समजताच त्यांनाही मोठा धक्का बसला होता. ही अभिनेत्री कोण आणि तिच्या कहाणीबद्दल जाणून घ्या.
लग्नाआधी गरोदर होती 'ही' अभिनेत्री
ही अभिनेत्री आहे नेहा धुपिया. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा जन्म लष्करी कुटुंबात झाला. नेहा धुपियाने मिस इंडियाचा किताब जिंकून फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण, मिस इंडिया नेहाला बॉलिवूडमध्ये फारच यश मिळू शकलं नाही. 2018 साली तिने अंगद बेदीसोबत गुपचूप लग्न उरकलं. यामागे ही एक मोठं कारण होतं. खरंतर, नेहा धुपिया लग्नाआधीच गरोदर राहिली होती.
कुटुंबियांना बसला मोठा धक्का
अभिनेत्री नेहा धुपियाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी केरळमधील कोची येथे लष्करी कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रदीप सिंग धुपिया हे भारतीय नौदलाचे अधिकारी होते आणि आई मणिपिंदर धुपिया गृहिणी आहेत. नेहाचं शिक्षण दिल्लीत झालं. मॉडेलिंगनंतर ती बॉलिवूडकडे वळाली. नेहाने 2003 मध्ये 'कयामत : सिटी अंडर थ्रेट' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नेहाला खरी ओळख 2004 मध्ये आलेल्या 'जुली' चित्रपटातून मिळाली. पण, नेहा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली.
2018 मध्ये गुपचूप उरकलं लग्न
नेहा धुपियाने 2018 साली तिचा खास मित्र अंगद बेदीसोबत गुपचूप लग्न केलं होतं, त्यामागील कारण म्हणजे ती लग्नाआधीच गर्भवती झाली होती. लग्नानंतर काही वेळातच दोघांनीही मुलगी मेहर बेदीचे स्वागत केलं. मुलीच्या जन्माआधीच प्रेग्नन्सीमुळे नेहाने अंगद बेदीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं. आज दोघेही सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. पण दोघांच्या अचानक झालेल्या लग्नाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. लग्नाच्या तीन वर्षानंतर 2021 मध्ये त्यांचा मुलगा गुरिक सिंग धुपिया बेदीचा जन्म झाला.
आई-वडिलांनी दिली 72 तासांची वेळ
नेहाने तिच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, जेव्हा तिच्या घरच्यांना लग्नाआधी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनाही धक्का बसला होता. नेहाने टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, तुझ्याकडे लग्नाला फक्त 72 तास आहेत असं आई-वडिलांनी मला सांगितलं. 'त्यांनी मला लग्नासाठी फक्त अडीच दिवसांचा वेळ दिला आणि मी मुंबईला पोहोचताच अंगदशी लग्न केलं'.
नेहा धुपिया आणि अंगद बेदी दोघेही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असून कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसतात. याशिवाय दोघेही सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. नेहा तिच्या इंस्टाग्रामवर मुलगी मेहर आणि मुलगा गुरिकसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :