Dilip Kumar Passes Away : दिलीप कुमार यांच्या अभिनयाची आपली अशी एक शैली होती. त्यांना खरंतर ट्रॅजेडी किंग म्हटलं जायचं. पण त्याही पलिकडे दिलीपकुमार हे रसायन होतं. कारण, भूमिका, संवाद समजून घेऊन त्यांची संवादफेक करण्याकडे त्यांचा कल होता. त्यांच्या चित्रपटातले कोणतेही संवाद काढून बघितले तर लक्षात येतं, विरामचिन्हांचा प्रभावी वापर या अभिनेत्याने केला. 

 

संवादांमध्ये विरामचिन्ह फार महत्वाची असतात. स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, अर्धविराम इतकं की वाक्यापुढे असलेले तीन डॉटही दिलीपकुमार यांनी आपल्या संवादांतून उतरवले. कारण, शब्दांचा, वाक्यांचा आणि एकूण परिस्थितीचा पुरेसा अंदाज घेऊन त्याची संवादफेक असेल. म्हणूनच त्यांचे संवाद सुपरहिट झाले. दिलीप कुमार यांचा काही दिवसांपूर्वी एक फुटपाथ नावाच्या सिनेमाचा संवाद खूप व्हायरल झाला होता. खरंतर गरीब कामगारांविषयीचा तो संवाद होता. त्या संवादात नायक म्हणून दिलीपकुमार यांना आदळआपट करता येत होतीच. पण तसं त्यांनी न करता अत्यंत संयतपणे आपली सावदफेक कली. म्हणूनच अत्यंत शांतपणे कोणतेही आक्रमक आविर्भाव नसतानाही त्यांचे संवाद प्रभाव ठरतात. आणि हीपेक्षा महत्वाची बाब अशी की त्या संवादांमध्ये असलेली शांतता. ज्याला आपण पॉज म्हणून ओळखतो तो अंगावर येतो. 

 

अभिनय करताना कॅमेरासमोर कसं उभं रहायचं, तो करताना आपल्या शारीरीक हालचाली कशा ठेवायच्या याची पुरेशी कल्पना दिलीप कुमार यांना होती. म्हणून दिलीप कुमार यांना पाहून अभिनयाचे धडे गिरवणारे अनेक आहेत. अनेक कलाकारांनी दिलीप कुमार गेल्यानंतर ट्विट करताना दिलीपकुमार हे एक विद्यापीठ असल्याचं म्हटलं आहे. आपल्या हातांचा वापर ते फारच सुरेख पद्धतीने करत असत. त्याशिवाय नजरेतून बोलणारा हा नायक होता. अनेक मराठी कलाकारांनीही याबद्दल वेदना व्यक्ते केली आहे. सुरेश वाडकर, मोहन आगाशे, मकरंद देशपांडे असे अनेक. 

 

गेल्या काही वर्षापासून दिलीपकुमार आजारी आहेत याची कल्पना सगळ्यांनाच होती. पण दिलीपकुमार आजून हयात आहेत यातच सगळ आलं होत. पण आता आजच्या बातमीने मात्र सर्वांना धक्का दिला. कारण, दिलीप कुमार यातूनही बरे होतील असं अनेकांना वाटत होत. पण दुर्दैवाने मंगळवारी सकाळी ही बातमी आली. शिक्षणाचं.. अभिनयाचं.. बुद्धीचं एक विद्यापीठ आज शांत झालं.

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :