Dilip Kumar Passed Away : महम्मद युसुफ खान... अर्थात दिलीप कुमार. गेल्या अनेक वर्षांपासून दिलीपकुमार आजारी होते. तब्येत बिघडली की, त्यांना इस्पितळात दाखल केलं जायचं. त्यांच्या तब्येतीबद्दल प्रार्थना व्हायच्या आणि त्यानंतर ते बरे होऊन परतही येत होते. पण मंगळवार त्याला अपवाद ठरला. आज दिलीपकुमार यांच्या जाण्याने मोठा आधार बॉलिवूडने गमावला आहे. ट्रॅजेडी किंग अशी त्यांची ओळख असली तरी अनेकांना माहीत नसेल पण आपलं मानधन लाखांत घेणारा तो पहिला मोठा कलाकार होता. 

Continues below advertisement


दिलीप कुमार यांनी आपल्या अभिनयाने आपलं बस्तान बसवलं. पहिला मेथडिकल अॅक्टर असा लौकिक त्यांचा होताच. पण त्याही पलिकडे एकापेक्षा एक उत्तम सिनेमे दिल्यामुळे आपल्या सिनेमात दिलीप कुमार हवा असं प्रत्येकाला वाटत होतं. म्हणूनच दिलीप कुमार यांची मागणी वाढली. अत्यंत निवडक संहिता घेऊन दिलीप कुमार काम करत होते. अशातच सिनेमांना मिळणारं यश पाहता सर्वांप्रमाणेच दिलीप कुमार यांनी आपलंही मानधन वाढवायचा निर्णय घेतला. आणि हिंदी इंडस्ट्रीत चर्चा सुरु झाली ती त्यांच्या मानधनाची. आपलं मानधन सिनेमासाठी एक लाख कराणारा हा पहिला अभिनेता ठरला. हा काळ होता 1955 चा. म्हणजे ज्यावेळी सर्वसामान्य घरात शंभर रुपयात गोष्टी भागवल्या जात होता तेव्हा दिलीपकुमार यांनी आपलं मानधन लाखांत केलं होतं. 


निर्मात्यांनी त्यांना ते मानधन देऊही केलं. कारण दिलीपकुमार आपल्या सिनेमातून अनुभव द्यायचे. हा अनुभव घेण्यासाठी दिलीपकुमार यांना लाखमोलाची रक्कम देण्याकडे निर्मात्यांचा कल असायचा. आज अनेक खानमंडळी कोट्यावधी रुपये मानधन घेतात. आता तर अनेक कलाकार शंभर कोटींच्या पलिकडे गेले आहेत. पण ते आत्ताच्या काळात. लाखभर रुपयाचं मानधन घेऊन काम करणारा पहिलावहिला कलाकार होता दिलीप कुमार. देवदास, आन, मधुमती, मुघल ए आजम गंगा जमुना असे एकापेक्षा एक सिनेमे देणाा हा चंदेरी पडद्यावरचा खरा नटसम्राट होता ते त्यामुळेच. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Dilip Kumar Passes Away : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड