Dhurandhar Box Office collection: आदित्य धर दिग्दर्शित स्पाय-अ‍ॅक्शन थ्रिलर ‘धुरंधर’ची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अजूनही सुरूच आहे. सातवा आठवडा सुरू होऊनही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. अनेक नव्या चित्रपटांना मागे टाकत ‘धुरंधर’ने सातव्या आठवड्यातही दमदार कमाई केली आहे. आता 47व्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Dhurandhar) धुरंधरने मोठ्या पडद्यावर साधारण दीड महिना घालवला आहे.  रिलीजनंतर तब्बल सातव्या आठवड्यात हा चित्रपट कोट्यवधींची कमाई करत आहे. एकीकडे राहू केतू, हॅपी पटेलसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना धुरंधर बॉक्स ऑफिसवर खोऱ्याने पैसा ओढताना दिसतोय.  सुरुवातीच्या आठवड्यांपेक्षा जरी कमाई घटली असली तरी चित्रपट दीड महिन्यानंतरही कलेक्शन करतोय हे महत्त्वाचं आहे.

Continues below advertisement

7व्या मंगळवारी ‘धुरंधर’ची कमाई किती?

रणवीर सिंग स्टार ‘धुरंधर’ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अनेक मोठ्या सुपरस्टार्सच्या चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. सातव्या आठवड्यात पोहोचल्यानंतरही ‘धुरंधर’ची पकड प्रेक्षकांवर कायम आहे. अर्थात, आता कमाईचा वेग काहीसा मंदावला असला तरी चित्रपट दररोज एक कोटी रुपयांच्या आसपास कमाई करत आहे आणि तरीही नव्या रिलीज झालेल्या चित्रपटांना टक्कर देत आहे.

आतापर्यंतची बॉक्स ऑफिसरची कमाई

पहिल्या आठवड्यात 207.25 कोटी रुपयेदुसऱ्या आठवड्यात 253.25 कोटी रुपयेतिसऱ्या आठवड्यात 172 कोटी रुपयेचौथ्या आठवड्यात 106.5 कोटी रुपयेपाचव्या आठवड्यात 51.25 कोटी रुपयेसहाव्या आठवड्यात 26.35 कोटी रुपये कमावले.

Continues below advertisement

तसेच, 42व्या दिवशी चित्रपटाने 3 कोटी, 43व्या दिवशी 3.75 कोटी, 46व्या दिवशी 1.5 कोटी आणि 47व्या दिवशी सुमारे 1.5 कोटी रुपये कमावल्याचा अंदाज आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘धुरंधर’ची 47 दिवसांची एकूण कमाई 828.10 कोटी रुपये इतकी झाली आहे.

850 कोटींचा टप्पा गाठणं अवघड?

सध्या ‘धुरंधर’च्या कमाईत सातत्याने घट होत आहे. आता रोज 2 कोटींची कमाई करणंही कठीण जात असल्याने 850 कोटींचा टप्पा पार करणं आव्हानात्मक वाटत आहे. त्यातच 23 जानेवारीपासून सनी देओल आणि वरुण धवन यांचा ‘बॉर्डर 2’ चित्रपट प्रदर्शित होत असल्याने स्पर्धा आणखी वाढणार आहे. आता ‘बॉर्डर 2’ समोर ‘धुरंधर’ आपली बॉक्स ऑफिसवरील पकड कायम ठेवतो की हळूहळू थिएटरमधून बाहेर पडतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.