नवी दिल्लीः टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक ‘धोनीः दी अनटोल्ड स्टोरी’ सिनेमाचं पहिलंवहिलं गाणं रिलीज झालं आहे. क्रिकेटर बनण्याची अस्वस्थता धोनीने कशी अनुभवली आहे, ते या गाण्यात दाखवण्यात आलं आहे.


 



 

शाळेतील अभ्यास, परीक्षा ते मैदान हा संघर्षाचा दैनंदिन प्रवास धोनीने कसा पार केला, ते गाण्यातून दिसत आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी हिंदीसह, मराठी, तामीळ, तेलुगु भाषेत देशभरात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात धोनीच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे.

 



 

निरज पांडे दिग्दर्शित ‘धोनीः दी अनटोल्ड स्टोरी’ सिनेमाची उत्सुकता वाढतच चालली आहे. या सिनेमाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओद्वारे केली आहे. सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका निभावण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांची भलीमोठी फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

 

पाहा गाणंः

संबंधित बातमीः  'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'चं नवं पोस्टर रिलीज