Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) सध्या चर्चेत आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याच्या अफवा सध्या पसरत आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. पण या सर्व चर्चांवर बॉबी देओलने (Bobby Deol) अखेर मौन सोडले आहे. 


बॉबी देओलने दिली प्रतिक्रिया


धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याच्या चर्चांवर बॉबी देओलने अखेर प्रतिक्रिया दिली आहे. बॉबी देओल म्हणाले, धर्मेंद्र यांची प्रकृती ठिक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले या केवळ अफवा आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती ठिक असल्याने धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. 


एप्रिल महिन्यात रुग्णालयात दाखल होते धर्मेंद्र


एप्रिल महिन्यात धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. घरी परतल्यानंतर त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी ‘मी धडा शिकलो..’, असं म्हणतं एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. 


धर्मेंद्र पुढे म्हणाले होते, "पाठीच्या स्नायूंमध्ये त्रास झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते. ते दोन-चार दिवस कठीण होते. पण, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि देवाच्या आशीर्वादाने मी परत आलो आहे. आता काळजी करू नका. मी स्वतःची खूप काळजी घेणार आहे."


86 वर्षीय धर्मेंद्र सोशल मीडियावर अॅक्टिव्ह


86 वर्षीय धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांचे अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा धर्मेंद्र यांचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 2023 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  धर्मेंद्र स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.  ते अनेकदा त्यांच्या फार्महाऊसवर पोहताना आणि व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात.  


संबंधित बातम्या


Dharmendra Health Update: ‘मी धडा शिकलो...’, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच धर्मेंद्र यांनी शेअर केला व्हिडीओ!


Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल