Hema Malini on Dharmendra Health Update: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (89) (Dharmendra) यांना अलीकडेच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काहींनी दिलेल्या माहितीमध्ये,त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता, तर काहींनी हे फक्त नियमित तपासणी असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर काही माध्यमांत मृत्यूच्या अफवाही पसरू लागल्या. मात्र, आता त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांच्यासोबत सनी देओल आणि त्याचे दोन्ही मुलं करण आणि राजवीरही सोबत होते. अभिनेता धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत त्यांनी भाष्य केले आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. सनी देओलच्या टीमने माहिती दिलीय.

Continues below advertisement


तब्येत स्थिर, व्हेंटिलेटरवर असल्याच्या अफवा..


सोमवारी हेमा मालिनी ब्रीच कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांची भेट घेताना दिसल्या. त्यांच्या प्रकृतीबाबत विचारल्यावर त्यांनी “आम्ही त्यांच्या लवकर बऱ्या होण्याची अपेक्षा करत आहोत.” याआधी 1 नोव्हेंबरला धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले  अशाच प्रकारचे वृत्त समोर आले होते. धर्मेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओल देखील सोमवारी रुग्णालयात पोहोचल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.


त्यानंतर त्यांच्या टीमने सर्व अफवांना स्पष्ट उत्तर दिले. ही नेहमीसारखीच अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.सनी देओल यांच्या टीमने व्हेंटिलेटरवर असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या. त्यांनी सांगितले, “नेहमीसारखंच अफवा पसरवणे आहे. सर आता बरे आहेत. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. काळजी करण्यासारखं काही नाही.” 


 






धर्मेंद्र लवकरच ‘इक्कीस’मध्ये


धर्मेंद्र, ज्यांनी दशकानुदशके ‘शोले’, ‘ड्रीम गर्ल’सारख्या सुपरहिट चित्रपटांतून आपली छाप सोडली, त्यांना अलीकडेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (२०२३) मध्ये पाहिले गेले. धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवन दिग्दर्शित युद्धावर आधारित ‘इक्कीस’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात अगस्त्या नंदा मुख्य भूमिकेत आहे.सध्या धर्मेंद्र डॉक्टरांच्या निगराणीखाली असून लवकरच ते घरी परतण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धर्मेंद्र यांचे वय आणि पूर्वीच्या आरोग्य समस्या पाहता डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांची तब्येत लवकर सुधारावी, अशी प्रार्थना देशभरातील चाहत्यांनी व्यक्त करत आहे.