Dhanush- Aishwaryaa Divorce : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धनुषने पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी 17 जानेवारी रोजी रात्री उशिरा सोशल मीडियावरून विभक्त झाल्याची माहिती दिली. धनुषच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच धक्कादायक आहे. त्याहीपेक्षा या दोघांनी 18 वर्षांचा संसार कोणत्या कारणासाठी तोडला हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. परंतु, या संदर्भात धनुष किंवा ऐश्वर्या या दोघांकडूनही असे कोणतेही वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही, ज्यामध्ये दोघे वेगळे का झाले हे सांगितले आहे. परंतु, या दोघांच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या विभक्त होण्यामागचे कारण सांगितले आहे.
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना धनुष आणि ऐश्वर्याच्या मित्राने या दोघांच्या विभक्त होण्याचे कारण सांगितले आहे. 'धनुष आपल्या कामाला खूप महत्व देतो. काम आणि आऊटडोअर शूटिंगमुळे धनुष आपल्या कुटुंबापासून सतत दूर असतो. तो नेहमी स्वतःला कामात गुंतवून ठेवतो. याशिवाय धनुष आपल्या मित्रांसोबतही त्याच्या जास्त गोष्टी शेअर करत नाही. त्याच्या मनात काय चालले आहे? ते कोणीच सांगू शकत नाही. धनुष आणि ऐश्वर्यामध्ये जेव्हा भांडण होत असे किंवा दोघांमध्ये काही मतभेद निर्माण झाले, तर स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी हे दोघे एखादा चित्रपट साइन करत असत, अशी माहिती धनुष आणि ऐश्वर्याच्या मित्राने दिली.
कुटुंबातील ताण कमी करण्यासाठी धनुष नेहमी स्वतःला व्यस्त ठेवतो. गेले 6 महिने या दोघांसाठी खूप कठीण गेले. धनुष आणि ऐश्वर्याच्या मनात खूप दिवसांपासून वेगळे होण्याचा विचार सुरू होता. घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यापूर्वी दोघांमध्ये खूप चर्चा झाली होती. 'अतरंगी रे'चे प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर काही घोषणा करावी', अशी धनुषची इच्छा होती, असे त्याच्या मित्राने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- Dhanush Aishwarya : अफेअरच्या केवळ अफवा अन् घाईगडबडीत केलं लग्न, जाणून घ्या धनुष-ऐश्वर्याची भन्नाट लव्ह-स्टोरी
- अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट; 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त