Aishwaryaa Rajinikanth-Dhanush Separated : अभिनेता धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या  रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) यांचा घटस्फोट झाला आहे. 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर ते विभक्त झाले आहेत. धनुष आणि ऐश्वर्या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. ऐश्वर्या आणि धनुष 2004 साली लग्नबंधनात अडकले होते. तसेच त्यांना दोन मुले आहेत.






ऐश्वर्याने विभक्त झाल्याची माहिती देत लिहिले आहे,"कोणत्याही मथळ्याची गरज नाही. फक्त तुमची समज आणि तुमचे प्रेम आवश्यक आहे". 





धनुषचा नुकताच 'अतरंगी रे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात धनुषने महत्त्वाची भूमिका साकारली होती. विशेष बाब म्हणजे ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी असून ती चित्रपट दिग्दर्शक आणि पार्श्वगायिका देखील आहे.


धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर मीडियावर विभक्त झाल्याची माहिती देत लिहिले आहे,"मित्र, जोडपे, आई-वडील आणि एकमेकांचे हितचिंतक म्हणून 18 वर्षे एकत्र राहण्याचा हा प्रवास समजूतदारपणाचा, जुळवून घेण्याचा होता. पण आज आम्ही दोघांनी  विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा".  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha