मुंबई : कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या चित्रपटातील 'धाकड' या गाण्याचं आमीर खानच्या आवाजातील व्हर्जन रिलीज करण्यात आलं आहे.


तब्बल 18 वर्षांच्या कालावधीनंतर आमीरने पुन्हा चित्रपटासाठी गाणं गायलं आहे. धाकड या गाण्यात महिला सक्षमीकरणावर भाष्य करण्यात आलं असून भारताच्या लेकींना हे गाणं समर्पित करत असल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. हे गाणं चित्रपटाचा भाग नसून केवळ प्रमोशनसाठी वापरण्यात येणार आहे. मात्र आमीर रॅपरसारखं 'स्वॅग' स्टाईल ड्रेसिंग करुन थिरकताना पाहण्यात चाहत्यांना मजा येत आहे.

1998 मध्ये 'गुलाम' चित्रपटासाठी 'आती क्या खंडाला' हे गाणं त्याने गायलं होतं. त्यानंतर 1999 मध्ये आलेल्या 'सरफरोश'मधल्या 'इस दिवाने लडके को..' गाण्यात त्याने दोन ओळी म्हटल्या होत्या, तर 'फना' चित्रपटातील 'चंदा चमके'तील काही ओळी गुणगुणल्या होत्या. मात्र अख्खं गाणं गाण्याची ही 1998 नंतरची पहिलीच वेळ आहे.

आमीर खानचा दंगल हा चित्रपट 23 डिसेंबर 2016 रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा गाणं :


संबंधित बातम्या :


आमीर खान आज कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार


वस्तादांचं निमंत्रण, आमीर कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार!


कुस्तीसाठी 'दंगल' टॅक्स फ्री करावा, आमीर खानची मागणी


नोटाबंदीबाबत सर्वांनी पंतप्रधानांना पाठिंबा द्यावा : आमीर