हैदराबाद : मच अवेटेड सिनेमा 'दंगल' टॅक्स फ्री करा, अशी मागणी अभिनेता आमिर खान याने केली आहे. येत्या 23 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. कुस्तीला प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने आमिरने सिनेमा टॅक्स फ्री व्हावा, असं म्हटलं आहे.

हैदराबादमध्ये 'दंगल' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमिर खान बोलत होता.

आमीरने या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची त्याच्या खास शैलीत उत्तरं दिली. 'पीके' सिनेमातील भूमिकेनंतर 'दंगल'साठी वजन कसं वाढवलं, याबाबतही त्याने दिलखुलास उत्तरं दिली.

सिनेमात आमीरने पैलवान महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारली आहे. त्याने 'दंगल' चित्रपटात तरुण आणि वृद्ध महावीर फोगट यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. या भूमिकेसाठी आमीरने सुरुवातीला त्याचं वजन सुमारे 90 किलोपर्यंत वाढवलं होतं. त्यासाठी त्याने वजन कमालीचं वाढवण्याची आणि कमी करण्याची मेहनतही घेतली होती.

महावीर फोगट यांनी आपल्या दोन कन्या गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे. चित्रपटात फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या नवोदित अभिनेत्री अनुक्रमे गीता आणि बबिताच्या भूमिकेत दिसतील. गीताने 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण तर बबिताने रौप्यपदक पटकावलं होतं.

संबंधित बातम्या :

वस्तादांचं निमंत्रण, आमीर कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार!


दंगलसाठी आमीरने तब्बल 30 किलो वजन वाढवलं आणि घटवलं


आमीर खानच्या 'दंगल'मधील नवं गाणं


गीता फोगटच्या लग्नाला आमीरची हजेरी