Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलीनानं (Devoleena Bhattacharjee) काही दिवसांपूर्वी शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर अनेकांनी देवोलीनाला ट्रोल केलं. अनेक नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून देवोलीनाला ट्रोल करतात. नुकताच एका नेटकऱ्यानं लव्ह जिहादबाबत केलेल्या ट्वीटमध्ये देवोलीना आणि तिच्या पतीच्या नावाचा उल्लेख केला. या ट्वीटला देवोलीनानं रिप्लाय दिला आहे.
नेटकऱ्याचं ट्वीट
'डॉक्टरनी जी, देवोलिना भट्टाचार्जीला द केरळ स्टोरी चित्रपट बघायला बोलावले होते का? या चित्रपटात त्यांनी काम केले आहे, wikipedia मध्ये आहे. तिच्या पतीचे नाव शाहनवाज शेख आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल. लव्ह जिहाद की ऐसी की तैसी.' असं या ट्वीटमध्ये नेटकऱ्यानं लिहिलं.
देवोलीनाचा रिप्लाय
नेटकऱ्याच्या ट्वीटला देवोलीनानं रिप्लाय दिला, अरे खान साहाब, मला चित्रपट बघायला बोलवण्याची करायची गरज नव्हती. मी आणि माझे पती आम्ही दोघांनी द केरळ स्टोरी चित्रपट पाहिला आहे. आम्हा दोघांनाही चित्रपट खूप आवडला. तुम्ही ट्रू इंडियन मुस्लिम हे नाव ऐकले आहे का? चुकीला चुकीचे म्हणण्याची ताकद आणि हिंमत दोन्ही असलेल्यांपैकी माझे पती आहेत.'
काही दिवसांपूर्वी द केरळ स्टोरीबाबत एका नेटकऱ्यानं ट्वीट केलं होतं. या ट्वीटला देखील देवोलीनानं रिप्लाय दिला होता. तिनं रिप्लाय देत लिहिलं होतं, 'माझा नवरा मुस्लिम आहे आणि तो माझ्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्यानं चित्रपटाचं कौतुक केले. हा चित्रपट त्यांच्या धर्माविरुद्ध आहे, असे त्याला वाटले नाही. मला असे वाटते की, प्रत्येक भारतीय असे असावे.' गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी हा चित्रपटाची चर्चा होत आहे.
देवोलीनानं काही दिवसांपूर्वी जिम ट्रेनर शाहनवाजसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हा अनेकांनी देवोलीनाला ट्रोल देखील केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या: