कोल्हापूर: कोल्हापूरच्या होतकरु दिग्दर्शकाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मजल मारली आहे. दिग्दर्शक नीरज नारकर यांच्या देवी या लघुपटाची कॅनडातील टोरँटो इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियायी चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.


20 मे रोजी या लघुपटाचं स्क्रीनिंग होणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे नीरज नारकर यांनी देशाच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारा लघुपट बनवला आहे.

बलात्कार पीडित बेशुद्ध मुलीला मंदिरात आणलं जातं. मंदिराचा पुजारी आणि त्याचा वयात येणाऱ्या मुलाचं मुलीसोबतचं वर्तन, लैंगिक अत्याचार अशा तीन पात्रांभोवती या लघुपटाची कथा फिरते.



तंत्रज्ञानाचा योग्य वापर, तगडी स्क्रिप्ट, उत्तम मांडणी हे नीरज नारकर यांचं वैशिष्ट्य आहे. त्याची झलक ‘नाना परीट, पांगरी’  या लघुपटात पाहायला मिळाली होती. नीरज आणि निखील नारकर या बंधूंचा ‘नाना परीट, पांगरी’ हा लघुपटही 2016 मध्ये कॅनडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडण्यात आला होता.

त्यानंतर आता देवीनेही कॅनडाचं दार ठोठावलं आहे.

या लघुपटाचं शूटिंग कोल्हापूरजवळच्याच गिरगाव इथं पार पडलं. या गावातीलच सुरेश साळोखेंसह अन्य गावकऱ्यांनी ‘देवी’ पूर्णत्वास नेण्यास हातभार लावल्याचं दिग्दर्शक सांगतात.
VIDEO: