मुंबई : एव्हरग्रीन हँडसम हंक अशी ख्याती असलेला मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची 25 वर्षांनी लहान गर्लफ्रेण्ड अंकिता कोवर यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. पैशांसाठी अंकिताने मिलिंदला सोडल्याचं म्हटलं जात आहे. परंतु ह्या वृत्तांनी त्रासलेल्या अंकिताने उत्तर देण्यासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला असून त्यात ती मिलिंद सोमणसोबत दिसत आहे. ह्या फोटोला तिने कॅप्शन दिलं आहे की, "रिलेशलशिपसाठी सर्वात चांगल्या गोष्टी म्हणजे वेळ, संभाषण, समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणा." याशिवाय तिने #मायमॅन, #लव्ह, असे हॅशटॅगही वापरले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असून त्यांच्या ब्रेकअपची फक्त अफवा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र याबाबत दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पैशांसाठी अंकिताने मिलिंदला सोडल्याची चर्चा ऐन लग्नाच्या तोंडावर 52 वर्षांच्या मिलिंदला त्याची गर्लफ्रेण्ड अंकिता कोवरने 'डिच' केल्याचं वृत्त व्हायरल झालं. लॉटरी लागल्यामुळे 27 वर्षांच्या अंकिता कंवरने मिलिंद सोमणला बायबाय केल्याची चर्चा आहे. अंकिता महिना 26 हजार रुपयांच्या पगारावर एका विमान कंपनीत फ्लाईट अटेंडंट म्हणून नोकरी करत होती. मोकळ्या वेळेत अंकिता मोबाईलवर कसिनो खेळायची. हा गेम खेळता खेळता तिला 8 लाख 73 हजार 982 रुपयांचा जॅकपॉट लागला. जॅकपॉट लागल्यानंतर अंकिताने मिलिंद सोमणसोबत संपर्क तोडल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. मिलिंदचे फोनही अंकिता उचलत नसल्याचं म्हटलं जातं. मात्र या वृत्ताच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कायम होतं. त्यातच अंकिताने मिलिंदसोबतचा फोटो शेअर करुन दोघे अजूनही प्रेमात असल्याचं दिसत आहे. संबंधित बातम्या प्यार झूठा, पैसा सच्चा, लॉटरीसाठी अंकिताने मिलिंदला सोडलं? मिलिंद सोमण-अंकिता कोवरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला? बर्थ डे स्पेशल : नग्न जाहिरात ते 25 वर्ष लहान गर्लफ्रेण्ड, आयर्नमॅनची कहाणी आयर्नमॅन मिलिंद सोमणच्या मातोश्रींची 76 व्या वर्षी दौड

Continues below advertisement