Deva First Day Box Office Collection : अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा दमदार ॲक्शन आणि बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. शाहिद कपूरचा देवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट देवा रिलीज होताच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. देवा चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्यानंतर टीझर आणि ट्रेलर समोर आल्यावर चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता हा चित्रपट रिलीज झाल्यावर याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका पाहायला मिळत आहे.


'देवा' 2025 वर्षातील बंपर ओपनर


शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाची जेवढी चर्चा होती, जो बझ होता, तो आता बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या रुपता दिसत आहे. शाहिद कपूरचा 'देवा' चित्रपट 2025 वर्षातील बंपर ओपनर ठरला आहे. देवा 2025 या नव्या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग डे कलेक्शन करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. रोशन एन्ड्रयुज दिग्दर्शित 'देवा' चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. 


शाहिद कपूर 'दबंग' पोलिसाच्या भूमिकेत


बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'देवा' चित्रपट 31 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा 'देवा' चित्रपट फुल ऑन  ॲक्शन पॅक आहे. यामध्ये तितकाच ड्रामाही आहे. 'देवा' चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर 'दबंग' पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटामध्ये ॲक्शन, ड्रामा आणि मसाला असा फुल ऑन मनोरंजनाचा डोस आहे. यासोबत रोमान्सची जोडही आहे. 


'देवा' चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई


मनोरंजनाचा पूर्ण डोस असलेल्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'देवा' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 5 कोटी रुपये कमावले आहेत. जरी हे प्राथमिक आकडे असले तरी, अधिकृत आकडे जाहीर झाल्यानंतर त्यात काही बदल होऊ शकतात. 


शाहिद कपूरचा अक्षय कुमारला झटका


अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्या 'स्काय फोर्स' नंतर शाहिद कपूरचा 'देवा' हा चित्रपट 2025 मधील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटाने 12.25 कोटी रुपयांची कमाई केली. असं असलं तरी, शाहिद कपूरने अक्षय कुमारला झटका दिला आहे. शाहिदच्या 'देवा'मुळे 'स्काय फोर्स'च्या कमाईवर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे.


शाहिदच्या टॉप 10 मध्ये 'देवा'चा समावेश नाही


'देवा' चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या पण चित्रपटाला विशेष सुरुवात झालेली नाही. हा चित्रपटही शाहिद कपूरच्या टॉप 10 ओपनर चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवू शकला नाही. 


शाहिद कपूरचे बॉक्स ऑफिसवरील टॉप 10 ओपनर चित्रपटांची यादी



  1. कबीर सिंह - 20.21 कोटी

  2. पद्मावत - 19 कोटी

  3. शानदार - 13.10 कोटी

  4. आर... राजकुमार- 10.10 कोटी

  5. उड़ता पंजाब - 10.05 कोटी

  6. तेरी बातों में ऐसा उलझा जिया - 7.02 कोटी

  7. मौसम - 6.75 कोटी

  8. बत्ती गुल मीटर चालू - 6.76 कोटी

  9. हैदर - 6.14 कोटी

  10. रंगून - 6.07 कोटी


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Priyanka Chopra : 'जेव्हा ती अंडरवेअर दाखवेल...'; 19 व्या वर्षी बद्दल दिग्दर्शकाचं 'हे' वक्तव्य, अभिनेत्रीने शेअर केला 'तो' भयानक अनुभव