‘स्लमडॉग मिलेनियर’ सिनेमानंतर भारतात देवची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. या सिनेमानंतर देवने ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’मध्ये श्रीनिवास रामार्जुनची भूमिका साकारली होती. आता देव ‘लायन’मधून दिसणार आहे.
देव पटेल पुन्हा एकदा भारतातील गरीब मुलाच्या भूमिकेत दिसणार असून, जो परदेशात लहानाचा मोठा झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. देवचा आगामी ‘लायन’ सिनेमा सत्य कथेवर आधारित आहे.
‘लायन’ सिनेमा सारु ब्रेएर्लींच्या आयुष्यावर आधारित आहे. सारु हे पाच वर्षांचे असतानाच कुटुंबापासून विभक्त झाले होते. त्यानंतर एका परदेशी कुटुंबाने त्यांना दत्तक घेतलं आणि एक दिवस 'गूगल अर्थ'च्या मदतीने 25 वर्षानंतर आपल्या खऱ्या आई-वडिलांपर्यंत ते पोहोचले.
या सिनेमाची पार्श्वभूमी कोलकात्यातील आहे. नॉन फिक्शन पुस्तक ‘अ लाँग वे होम’वरुन प्रेरित हा सिनेमा आहे. या सिनेमात निकोल किडमॅन, डेव्हिल वेनहम आणि रुनी मारा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
येत्या 25 नोव्हेंबरला देव पटेलचा ‘लायन’ सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन गर्थ डेव्हिस यांनी केलं आहे.
पाहा ट्रेलर :