६१ वर्षीय खेर एकाद्या तरुणाप्रमाणेच जिममध्ये वर्कआउट करत आहे. त्यामुळे यांचे जिममधील एक्सरसाईज करतानाचे फोटो बॉलिवूडचा दबंग खान सलमानने आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत. तसेच त्यावरील कमेंटमध्ये सलमानने अनुपम खेर यांना चिमटे काढले आहेत.
सलमानने आपल्या ट्वीटमध्ये 'उपरवाला, बॉडी बिल्डर्स की खेर करे' असे म्हणले आहे.
सलमानच्या या ट्वीटला खेर यांनी फेसबूकवरुन उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या फेसबूक पेजवर, ''माझे फोटो ट्वीटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याबद्दल सलमानचे आभार मानतो. मला तुझी कमेंट आवडली. जय हो,'' असे लिहले आहे.