बॉलिवूडची प्रथितयश अभिनेत्री राणी मुखर्जी आणि यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा या सेलिब्रेटी कपलने विरानुष्काला हा सल्ला दिल्याची माहिती आहे. 'एशियन एज'मधील रिपोर्टनुसार आदित्य चोप्राने अनुष्काला इटलीतील हे स्थळ सुचवलं.
एप्रिल 2014 मध्ये आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जीही अशाचप्रकारे इटलीतील रिसॉर्टमध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्नाची कुणकुणही फार कमी जणांना लागली होती. बॉलिवूडमधील करण जोहर सारखे मोजके सेलिब्रेटी वगळता राणीच्या लग्नाला फार कोणी उपस्थित नव्हतं. 22 एप्रिल 2014 रोजी तिने एका स्टेटमेंटमधून लग्नाची घोषणा केली.
'देशात लग्न केलं तर त्याचा तमाशा होईल. पापाराझ्झी म्हणजेच फोटोग्राफर्सचा ससेमिरा चुकवता-चुकवता तुमच्या नाकी नऊ येतील' असं आदित्य चोप्रांनी अनुष्काला सांगितलं. अनुष्काने 2008 मध्ये यशराज फिल्म्सच्या 'रब ने बना दी जोडी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, त्यानंतर 'बँड, बाजा, बारात' 'जब तक है जान' सारख्या चित्रपटातही ती झळकली. त्यामुळे अनुष्कासाठी चोप्रा कुटुंब गुरुस्थानी आहे.
कसं आहे Borgo Finocchieto रिसॉर्ट?
विराट आणि अनुष्काचं लग्न इटलीतील Borgo Finocchieto रिसॉर्टमध्ये पार पडलं. हे रिसॉर्ट प्रचंड महागडं आणि ऐतिहासिक आहे. हे रिसॉर्ट तब्बल 800 वर्ष जुनं आहे. Tuscany च्या सुंदर डोंगररांगांमध्ये बनवण्यात आलेलं हे रिसॉर्ट एअरपोर्टपासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावर आहे.
या रिसॉर्टमध्ये केवळ 5 सुट्स, 5 व्हिला आणि फक्त 22 खोल्या आहेत. त्यामध्ये जवळपास 44 जणच राहू शकतात. याशिवाय स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट आणि स्पा सारख्या गोष्टीही इथे उपलब्ध आहेत. फोर्ब्सच्या ताज्या रिपोर्टनुसार, हे रिसॉर्ट जगातील दुसरं महागडं हॉलिडे डेस्टिनेशन आहे.
एका दिवसासाठी इथे तब्बल 15,000 डॉलर (अंदाजे दहा लाख रुपये) मोजावे लागतात. येथील खास वातावरणामुळे डिसेंबरमध्ये या ठिकाणाला बरेच पर्यटक पसंती देतात. याच वर्षी मे महिन्यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आपल्या पत्नीसोबत गेले होते.
विराट आणि अनुष्का हनिमूनसाठी रोमला जाणार आहेत. त्यानंतर 21 डिसेंबरला रिसेप्शन असल्यामुळे ते त्यापूर्वी भारतात परततील. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी होणार आहे.
VIDEO :
संबंधित बातम्या :
VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं!
विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!
विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!
पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा
विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती?
विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा!
दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन
रब ने बना दी जोडी... 'विरानुष्का'ची लव्हस्टोरी
क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या नात्याची परंपरा