मुंबई : 12 डिसेंबर म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस. थलैवाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी चाहते पुढाकार घेत असले, तरी गेल्या तीन वर्षांपासून रजनीकांत विविध कारणं देत सेलिब्रेशन टाळत आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या तीन दशकांपासून रजनीने आपल्या वाढदिवशी घरी किंबहुना शहरात किंवा देशातच राहणं टाळलं आहे, आणि त्याचं कारण हृदयाला चटका लावणारं आहे.
2015 मध्ये चेन्नईतील पूरामुळे रजनीकांतने चाहत्यांना आपला वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं, तर 2016 मध्ये मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे रजनीने वाढदिवस सेलिब्रेट न करण्यास चाहत्यांना सांगितलं. यावर्षीही ओखी चक्रीवादळामुळे बसलेला फटका लक्षात घेत, त्याने बर्थडे सेलिब्रेशन टाळलं. मात्र गेली तीनच वर्ष नाही, तर 27 वर्ष थलैवा चाहत्यांकडून होणारं सेलिब्रेशन टाळण्यासाठी आपल्या वाढदिवशी शहराबाहेर किंवा देशाबाहेर राहणं पसंत करत आहे.
पाच वर्षांपूर्वी म्हणजे 12-12-12 (12 डिसेंबर 2012) रोजी रजनीकांतने चेन्नईत आपल्या हार्डकोअर चाहत्यांना याचं कारण सांगितल्याचं 'द इंडियन एक्स्प्रेस'ने दिलं आहे.
'मी नेहमीच माझ्या बर्थडेला शहरात असायचो. सुमारे 22 वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाला माझे तीन चाहते मला भेटून घरी परतत होते. त्यावेळी कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दुःखात बुडालेल्या त्या तिघांच्या पालकांनी मला एक प्रश्न विचारला. त्याचं उत्तर मला देता आलं नाही. मला तो प्रश्न कोणालाच सांगायचा नाही. पण त्या दिवसानंतर वाढदिवासाला आपल्या घरी न थांबण्याचं मी ठरवलं' असं रहस्य त्याने उलगडलं होतं.
'माझ्या या निर्णयानंतर मी परगावी जायला लागलो. आतापर्यंत आयुष्यात काय काय केलं, याबाबत आत्मपरीक्षण करतो. सध्या मी काय करतोय आणि भविष्यात काय करायला आवडेल, याचा विचार करतो.' असं रजनीकांतने सांगितलं होतं.
27 एप्रिल 2018 रोजी रजनीकांतची भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रंजितचं दिग्दर्शन असलेल्या 'काला' चित्रपटाची रीलिजींग डेट अद्याप निश्चित झालेली नाही.
म्हणून गेली 27 वर्ष रजनीकांत बर्थडेला घरी नसतो...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Dec 2017 10:08 PM (IST)
गेली तीनच वर्ष नाही, तर सुमारे 27 वर्ष थलैवा चाहत्यांकडून होणारं सेलिब्रेशन टाळण्यासाठी आपल्या वाढदिवशी शहराबाहेर किंवा देशाबाहेर राहणं पसंत करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -