रणवीरसाठी दीपिकाने रणबीर कपूरच्या नावाच्या टॅटू मिटवला
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2018 08:40 PM (IST)
रणवीर सिंहसोबत लग्न झाल्यानंतर दीपिकाने रणबीर कपूरच्या नावाचा टॅटू आता मिटवला आहे
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांचा नुकताच इटलीत लग्नसोहळा पार पडला. परंतु रणवीरसोबत रिलेशनशीमध्ये येण्यापूर्वी दीपिका आणि अभिनेता रणबीर कपूर हे दोघे काही वर्ष रिलेशनशीपमध्ये होते, हे सर्वांनाच ठावूक आहे. दीपिकाने रणबीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये तिच्या मानेवर रणबीरच्या नावाचा टॅटू काढला होता. मानेवर ‘आरके’ असे लिहिले होते. परंतु रणवीर सिंहसोबत लग्न झाल्यानंतर तिने रणबीर कपूरच्या नावाचा टॅटू आता मिटवला असल्याचे पहायला मिळाले आहे. लग्नानंतर आज दीपिका आणि रणवीरचे बंगळुरु येथे रिसेप्शन पार पडले. रिसेप्शनला जातानाचा दीपिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दीपिकाच्या मानेवर टॅटू नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. दीपिकाचा हा टॅटू तेव्हा आणि आजही चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्या टॅटूची चर्चा सुरु केली आहे. 14,15 नोव्हेंबर रोजी दीपिका आणि रणवीर सिंग यांनी इटलीत लग्न केले. त्यांच्या लग्नसोहळ्याला मोजक्याच लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे आज या दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन बंगळुरूमध्ये पार पडले. 27 नोव्हेंबरला मुंबईत लग्नाचे अजून एक रिसेप्शन होणार आहे.